Sunday, 15 September 2019

शाळा

शाळा एक अविस्मरणीय
अशी आठवण
ज्याची प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात
करून ठेवलीय साठवण
आजही शाळा आठवली की
आठवत ते बालपण
दंगा मस्ती खोड्या
अन मित्र – मैत्रिणीच ते आपलेपण
खूप खेळ असायचे शाळेमध्ये
गॅदरिंग म्हणजे धमाल असायची
निरनिराळ्या पोषाखांमध्ये
नृत्य नाटक अन मज्जा असायची
शाळेला मनामध्ये
एक वेगळंच स्थान आहे
कीतीही दूर गेलो तरी
शाळा आमची शान आहे .